belgaum

आता मनपाचे पितळी नळ चोरट्यांचे लक्ष्य;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :चोरट्यांनी आता आपला मोर्चा महानगरपालिकेने सार्वजनिकांसाठी बसविलेल्या पितळी नळांकडे वळवला असून वडगाव भागात या नळांच्या चोरीचे प्रकार वाढले असल्यामुळे याकडे तात्काळ लक्ष देऊन प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

महापालिकेने सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बसविलेले पितळी नळ सध्या लंपास केले जात आहेत. विशेष करून वडगाव भागात याचे प्रमाण वाढले आहे.

सिद्धिविनायक मार्गावरील सूरज मोरे यांच्या घरासमोरील पितळी नळ एका चोरट्याने नुकताच लांबवला. नळ चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच पितळी नळ चोरीच्या या घटना रोखण्यासाठी स्थानिक महापालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.