Saturday, May 4, 2024

/

मनपा निवडणूकीवर संकट कायम?

 belgaum

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयातील दावा अद्याप सुरू आहे. हा दावा दाखल केलेल्या माजी नगरसेवकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला असून याविरोधात आम्ही मेमो देणार आहोत अशी माहिती दावेकर्त्यांनी दिली आहे.यामुळे निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती येण्याची दाट शक्यता असून संकट कायम आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात 6 तारखेला सुनावणी होती.यावेळी
निवडणूक आयोगाचे वकील फनिद्र यांनी फायनल हियरिंग ची तारीख वाढवून मागितली.सन्माननीय न्यायालयाने याची तारीख 16 तारखेला दिली मात्र ही सुनावणी होण्यापूर्वीच आज घाईगडबडीने निवडणूकप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

 belgaum

16 तारखेला अंतिम निर्णय होण्यापूर्वी केलेला हा प्रकार चुकीचा असून आम्ही मेमो घालणार आहे अशी माहिती या प्रकरणातील प्रमुख दावेदार धनराज गवळी यांनी दिली.
स्वतः धनराज गवळी,भैरगौडा पाटील, व इतर 10 जण याप्रकरणी न्यायालयात गेले असून आता हे प्रकरण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणार असल्याची चिन्हे आहेत.

आगामी 16 रोजीची सुनावणी आणि याचिकाकर्ते यांचा उध्या मेमो याकडेही सर्वांच्या नजरा लागुन राहिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.