belgaum

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटिंगपटू करुणा राजन वाघेला हिला 20 -2021 सालचा ‘जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

bg

गेल्या सात वर्षात करुणा वाघेला हिने स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामगिरीबद्दल तिला महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. करुणाने स्केटिंग क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावत अनेक पुरस्कार पटकाविले आहेत.

तिच्या या कार्याची दखल घेवून तिला खास समारंभात राजेंद्र भंडारी यांच्या हस्ते जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराच्या स्वरूपात 10 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.Bal pratibha

या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, अधिकारी कल्पना तमन्नावर, यल्लाप्पा गडादी, डी. एस. कुडलकील्क, सुरेखा हिरेमठ, नंदेश्वर, राममूर्ति के. व्ही. आदी उपस्थित होते.

करुणा ही बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करत आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.