belgaum

माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ रावडीशीटर्स विरुद्ध गुन्हा दाखल

0
921
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव न्यायालय आवारामध्ये रावडीशीटरकडून माध्यम प्रतिनिधींवर घडलेल्या हल्ला आणि अर्वाच्च्य शिवीगाळ प्रकरणी संबंधित चौघा रावडीशीटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवराज होळप्‍पा दड्डी, बसवण्णे उर्फ बसू सिद्धाप्पा नाईक, सविन सिद्धाप्पा दड्डी आणि लक्ष्मण फकीरप्पा दड्डी (सर्व रा. मुत्त्यानट्टी, बेळगाव) अशी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेल्या आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून 6 वर्षांपूर्वी शिवबसवनगर येथील शेख कॉलेजजवळ झालेल्या शहबाज शेरखान पठाण या तरुणाच्या खून प्रकरणी बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने काल चौघा जणांना दोषी ठरविले आहे.

सदर खून प्रकरणात गुंड लक्ष्मण दड्डी यांच्यासह त्याच्या साथीदारांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार आहे अशी माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी वार्तांकनासाठी न्यायालय आवारात गर्दी केली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्व आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयातून बाहेर आणून पोलीस जीपमध्ये बसवण्यात येत होते.

 belgaum

त्यावेळी छायाचित्र काढणाऱ्या तसेच व्हिडिओ चित्रीकरण प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेरामनवर आरोपींनी अर्वाच्च्य शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खुद्द पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने घटनास्थळी उपस्थितांकडून संताप व्यक्त होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.

तथापि घडल्या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांकडून उपरोक्त रावडीशीटर्स विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्र. 83 /2026 कलम 126(2), 132, 352, 351(3) सहकलम 3(5) बीएनएस 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.