Sunday, April 28, 2024

/

भरधाव स्विफ्टची झाडाला धडक : युवक जागीच ठार

 belgaum

खानापूर -पारिश्वाड रस्त्यावर भरधाव स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालक जागीच ठार तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

राहुल चंद्रकांत हणबर (वय 19, रा. खानापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नांव असून जखमीचे नांव विनायक चंन्नबसाप्पा पूजार (वय 19, रा. खानापूर) असे आहे. राहुल हा आपल्या मित्राला घेऊन काल शुक्रवारी स्विफ्ट कारने हिरेहट्टीहोळी येथे जात होता.

पारिश्वाड मशिदीजवळच्या वळणावर रात्री 8:30 च्या सुमारास नियंत्रण सुटल्याने त्यांच्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण चुराडा झाल्यामुळे राहुल जागीच ठार झाला.

 belgaum

मात्र सुदैवाने त्याच्या बाजूला बसलेल्या विनायक पुजार याला किरकोळ दुखापत झाली. अपघातात ठार झालेला राहुल खानापूरच्या आयटीआय कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होता. त्याचे वडील चंद्रकांत हणबर हे शिक्षक आहेत.

मयत राहुलच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजताच खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंगे व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.