belgaum

CCTVच्या नजरेखाली गणेशपूर–बेनकनहळ्ळी रस्ता

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशपूर–बेनकनहळ्ळी रस्त्यावर सर्रास कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बेनकनहळ्ळी नगर पंचायतने कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. नगर पंचायतने यापूर्वी अनेक वेळा जनजागृती फलक लावून नागरिकांना कचरा टाकू नये, असे आवाहन केले होते. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या गंभीर समस्येची दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

 belgaum

नगर पंचायतने जारी केलेल्या सूचनेनुसार,

  • सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
  • कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट ₹5,000 दंड आकारण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कचरा टाकणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगर पंचायतने दिला आहे.

स्वच्छ आणि निरोगी परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनी नगर पंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ दंड आकारणे हा उद्देश नसून, परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगर पंचायतच्या या कठोर निर्णयानंतर गणेशपूर–बेनकनहळ्ळी रस्ता पुन्हा स्वच्छ होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.