Friday, March 29, 2024

/

बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

 belgaum

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, कंग्राळी खुर्द, वाल्मीकिनगर आणि मच्छे औद्योगिक वसाहत परिसर या भागातील वीज पुरवठा उद्या बंद राहणार आहे.

त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलुर, मोरब, जांबोटी, ओलमनी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमनी, चिखले, कणकुंबी, गवसे,

 belgaum

आमगाव, बेटणे, पारवाड, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, जुने व नवे हुळंद या भागातील वीज उद्या खंडित केली जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.