Friday, April 26, 2024

/

डॉक्टर्स डे’ निमित्त ऑडिओलॉजी क्षेत्राबद्दल जनजागृती

 belgaum

काकतीवेस रोड येथील कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लीनिक या दशकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रवण आणि वाचा दोषावर उपचार करणाऱ्या दवाखान्यातर्फे ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून आज गुरुवारी एक दिवसाचे मोफत कान आणि वाचा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त सदर क्लिनिकचे
डाॅ. नागनाथ गौंड यांनी ‘बेळगाव लाइव्ह’ला दिलेली माहिती….

इसवी सन 1940 पासून दुसऱ्या महायुद्धामुळे बऱ्याच लोकांना नाॅईस इंड्युस्ड हिअरिंगमुळे श्रवण दोषाच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. तेंव्हापासून ऑडिओलॉजी या क्षेत्राचा उदय झाला. स्पीच अँड हिअरींग ही वैद्यकीय क्षेत्रातील एक शाखा असून हे क्षेत्र समाजाला तसे अपरिचित आहे. दहा वर्षापूर्वी बेळगावमध्ये ज्या मुलांना बोलण्याशी व ऐकण्याशी संबंधित समस्या होत्या, अशा मुलांच्या पालकांना मुलांसहित बेंगलोर आणि म्हैसूर या ठिकाणी स्पीच थेरपीच्या उपचारासाठी जावे लागत होते. बेळगावातील ही उणीव आणि गरज ओळखून कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लिनीक 12 डिसेंबर 2012 रोजी बेळगावकरांच्या सेवेसाठी रूजू झाले. त्यानंतर हळूहळू समाजातील श्रवण आणि वाचे संबंधित समस्या असलेल्या मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी 3 वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या 13 शहरांमध्ये या क्लिनिकच्या शाखा विस्तारित झाल्या आहेत.

समाजात ऐकण्याशी संबंधित बऱ्याच लोकांना समस्या आहेत. तथापि अशा प्रकारची समस्या असेल तर कुठे दाखवायचे? कोणत्या डॉक्टरांना दाखवायचे बहुतांश नागरिकांना माहित नसते. ऐकायला कमी आल्यानंतर कानाची मशीन घ्यायची असते असा बऱ्याच जणांचा असा समज असतो. मग ते ऑनलाईन पद्धतीने किंवा मशीन विक्रेत्या दुकानदाराकडून कानाचे मशीन खरेदी करून वापरायला लागतात. मात्र अशा रुग्णांना श्रवण यंत्र घेऊन सुद्धा ऐकाला व्यवस्थित येत नाही. कान हा मानवी शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो परंतु मशीन विक्रेत्यांनी कानाच्या रचनात्मक आणि कार्यात्मक क्षमतेचा कधी अभ्यास केला नसल्यामुळे ते लोकांच्या समस्या सोडवू शकत नाहीत. कोणत्याही कंपनीचे श्रवण यंत्र घेणे आणि ते रुग्णांना विकणे हा त्यांचा व्यवसाय असतो.Audiology

 belgaum

जसे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घेतो किंवा औषधे घेतो. त्याप्रमाणे स्पीच अँड हिअरिंग क्षेत्रामध्ये ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर कानाची श्रवण तपासणी करून श्रवण क्षमतेनुसार सेंसिन्युरल किंवा मिक्सस्ड प्रकारचा श्रवण दोष असेल तर श्रवण यंत्राने त्याचा फायदा होऊ शकतो का नाही? याचे मार्गदर्शन करतात. कानाच्या कार्यात्मक पद्धतीबद्दल ज्ञान नसल्यामुळे मशीन विक्रेत्यांकडून श्रवण यंत्र खरेदी केल्यास रुग्णांची रेसिड्युअल हिअरिंगवर (उरलेली श्रवण क्षमता) परिणाम होऊन त्या व्यक्तीला कायमचे कर्णबधिरत्व येऊ शकते. अशा प्रकारच्या समस्या असतील तर रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (आरसीआय) नोंदणी क्रमांक असलेल्या ऑडिओलॉजिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने ऐकण्याचे संवर्धन करण्याची आणि ही माहिती समाजाला देवून श्रवण बाधित लोकांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे डाॅ. नागनाथ गौंड यांनी स्पष्ट केले.

आता कोरोना प्रादुर्भाव काळात सर्वसामान्य जनतेसाठी मदतीचा हात म्हणून कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लिनिकच्या ऑडिओलॉजी विभागामार्फत ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून आज गुरुवार दि. 1 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचे मोफत कान आणि वाचा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात कानाच्या वेगवेगळ्या तपासण्या तज्ज्ञांद्वारे करण्यात येतील. तसेच गरजू रुग्णांना कमीत कमी दरामध्ये नामांकित कंपन्यांचे श्रवण यंत्रं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शिबिरासाठी निवड झाल्या सर्वच रुग्णांची तपासणी निशुल्क केली जाणार आहे.Krishna speech centre

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.