Friday, March 29, 2024

/

चार दिवसात 7.5 फुटांनी वाढली ‘राकसकोप’ची पातळी

 belgaum

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात तब्बल 7.5 फूटांनी वाढ झाली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जलाशय ओव्हरफ्लो होईल, असा अंदाज पाणीपुरवठा मंडळाने व्यक्त केला आहे.

गेल्या मंगळवारी राकस्कोप जलाशयाची पातळी 2454.5 फूट इतकी होती. त्यानंतर त्या रात्री पावसाला प्रारंभ झाला आणि सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे काल शनिवारी जलाशयाची पातळी 2462 फूट इतकी झाली होती. राकसकोप जलाशयातील पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाणी साठ्यामध्ये आणखी 14 फूटांनी वाढ होण्याची आवश्यकता आहे.

हिडकल जलाशयाची पाणीपातळी देखील वेगाने वाढले असून या जलाशयात चार दिवसात तब्बल 8 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. हिडकल जलाशयात इनफ्लो देखील 40,000 क्युसेक्सपर्यंत पोहोचला आहे. हिडकलची क्षमता 51 टीएमसी असल्यामुळे जलाशय भरण्यासाठी अद्याप 38 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

 belgaum

दरम्यान, राकसकोप व हिडकल जलाशयातील गतवर्षी व यंदाच्या पाणी साठ्याची तुलना केली तर यंदा ती समाधानकारक आहे. राकसकोप जलाशयातील 19 जून 2020 रोजी 2456.8 फूट पाणीसाठा होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप जलाशयात 5.5 फूट पाणी साठा जास्त आहे. हिडकल जलाशयात 19 जून 2020 रोजी 10.59 टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 3 टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे.

2019 व 2020 या दोन्ही वर्षी सदर जलाशये ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळेच यंदा उन्हाळ्यातही दोन्ही जलाशयात पुरेसे पाणी होते. शिवाय त्यामुळे यंदा बेळगावात पाणीटंचाईची परिस्थिती देखील उद्भवली नाही. मान्सूनची जोरदार सलामी झाल्याने सध्या जलाशयाची पातळी वाढली आहे. परिणामी येत्या 25 जूनपासून बेळगावच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारण्यापुर्वीच एल अँड टी कंपनीची पाणीपुरवठ्याची चिंता कमी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.