Thursday, April 18, 2024

/

युनिव्हर्सल ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

 belgaum

पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे खडेबाजार पोलिसांना रेन सुटचे वितरण करण्यात आले.
आपल्या विविध उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या युनिव्हर्सल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेन सूटचे वितरण केले.

सध्या कोरोना संक्रमण सुरू असून पोलिसांवर नेहमीपेक्षा कामाचा ताण आहे.आता पावसाल सुरुवात होणार असून सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये या उद्देशाने युनिव्हर्सल ग्रुप तर्फे शंभर दर्जेदार रेन सूटचे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या आवारात श्रेयकर बंधूंच्या हस्ते वितरण करण्यात आले.Universal

यावेळी किशोर श्रेयकर यांनी पोलीस खाते बजावत असलेल्या सेवेचे कौतुक करून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे रेन सूट वितरित करण्यात आल्याचे आपल्या भाषणात सांगितले.

 belgaum

यावेळी खडे बाजार उप विभागाचे ए सी पी चंद्रप्पा,खडे बाजार सी पी आय धीरज शिंदे ,युनिव्हर्सल ग्रुपचे रवी,किशोर,विवेक,विनायक,यशवंत श्रेयकर आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.