Friday, April 26, 2024

/

केएसआरटीसीच्या महाराष्ट्रातील बससेवेला उद्या प्रारंभ

 belgaum

केएसआरटीसीच्या महाराष्ट्रातील बससेवेला उद्या प्रारंभ

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) उद्या शुक्रवार दि. 25 जूनपासून 50 टक्के प्रवासी क्षमतेसह आपली महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंडळाच्या या निर्णयानुसार आता उद्यापासून बेंगलोर, शिमोगा, मंगळूर आणि राज्यातील अन्य ठिकाणाहून मुंबई, पुणे, मिरज, सोलापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या ठिकाणी आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह बससेवा सुरू होणार आहे.

 belgaum

कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आता पूर्ववत बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.