belgaum

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी लसीकरण आणि ऑक्सिजन पुरवठा करत सरकार कडून योग्य ती पाऊल उचलली जातील.राज्यातील पॉजीटीव्हीटी दर पाच टक्क्यांहून खाली आणण्यासाठी उपाय योजना आरोग्य खाते आणि प्रशासन करत आहे.शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देऊ  असे आश्वासन मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिले.

बेळगाव येथील सुवर्ण सौध मध्ये शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ,परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी,अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले, मंत्री श्रीमंत पाटील वरिष्ठ अधिकारी आमदार उपस्थित होते.

bg

बेळगाव जिल्ह्याची लोकसंख्या पहाता लसीकरण संख्या वाढवणार असून याबाबत आरोग्य सचिवाना चर्चा करण्याची सूचना देण्यात आली आहे.जिल्ह्याच्या स्थानिक समस्या आणि अहवाल तक्रारी बाबत पालक मंत्र्यांना कल्पना द्यावी अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.Cm covid review

बिम्स मधील प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास या आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले.जिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधा वाढवून 20 के एल ऑक्सिजन घटकाचे काम सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले.

उमेश कत्ती आणि गोविंद कारजोळ यांनी तालुका स्तरावरील इस्पितळामधील व्हेंटिलेटर दुरुस्ती करा अशी मागणी केली तिसरी लाट आल्यास बेड क्षमता वाढवण्यासाठी बस देखील सज्ज असतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री सवदी यांनी दिले.

 

बेळगाव जिल्ह्यात 144 नवीन वैद्यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यात सात नवीन ऑक्सिजन निर्मिती प्लांट मंजूर करण्यात आले आहेत लवकरचं याचे प्लांटचे काम सुरू केले जाईल असे आरोग्यमंत्री डी सुधाकर यांनी म्हटलं आहे.

नविननियुक्ती केलेल्या 144 डॉक्टरां पैकी 54 स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती झाली आहे देशात कर्नाटकात सर्वात जास्त कोविड चाचण्या केल्या जात आहेत त्यात 3 कोटी चाचण्या केल्या आहेत असेही ते म्हणाले.

जुने समाप्ती पर्यंत राज्याला 58 लाख लस मिळणार आहेत त्यामुळे लसीकरण समस्या देखील सुटेल असा विश्वास सुधाकर यांनी व्यक्त केला.

कोविड चाचण्या वाढवा -सतीश जारकीहोळी

बेळगाव जिल्ह्यातील कोविड तपासण्या वाढवण्याची मागणी करत राज्याबाहेरील प्रवाश्यांना निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक करा अशी मागणी यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली.

प्रत्येक तालुक्यात सरकारी इस्पितळाची संख्या वाढवा तसेच आयुष्यमान भारत योजना लागू असलेल्या खाजगी इस्पितळाच्या बिलांचे ऑडिट करा अशी देखील मागणी त्यांनी केली. आमदार अनिल बेनके यांनी बिम्स मधील बंद पडलेले 40 व्हेंटिलेटर दुरुस्त करा अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.