Saturday, April 20, 2024

/

मारवाडी युवा मंचतर्फे 16 रोजी रक्तदान शिबिर

 belgaum

मारवाडी युवा मंच, पंख (लेडीज विंग) आणि उडान (युथ विंग) बेळगाव यांच्यातर्फे गोमटेश विद्यापीठ व महावीर ब्लड बँकेच्या सहकार्याने येत्या बुधवार दि. 16 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गोमटेशनगर हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठ येथे दि. 16 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे एक दिवसीय रक्तदान शिबिर होईल.

मारवाडी युवा मंचच्या तीनही शाखांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या या शिबिराचा रक्तदात्यांनी बहुसंख्येने लाभ घेऊन शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक लस लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.Blood donation camp

लसीकरणानंतर कांही काळासाठी कोणीही व्यक्ती रक्तदान करू शकणार नाही. त्या काळात रक्ताची कमतरता पडू नये या उद्देशाने मारवाडी युवा मंचतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख राहुल मुंधडा यांनी दिली.

सदर शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी नांव नोंदणीसाठी अमित भाटी :9880509505, नीता तापडिया : 9449824307 किंवा ऋषभ जाजू 7795377764 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील राहुल मुंदडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.