Friday, September 20, 2024

/

ड्रोनच्या सहाय्याने पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभ

 belgaum

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन भात पिकांचे जे नुकसान झाले, त्याचे ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याच्या कामाचा आजपासून शुभारंभ करण्यात आला.

पावसामुळे भात पिकांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आमदार ॲड. अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या उपस्थित आज बुधवारी सकाळी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला.

डी. बी. पाटील यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे सर्वेक्षण केले जात आहे. गेल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून भात पिकासह सरसकट सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सचना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे.Ad benke

शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक पास बुक, सात -बारा उताऱ्यासह शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत किंवा सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असेल आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देणे सुलभ होणार आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे सरकारी बॅंक खात्यात पडून आहेत.

शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे त्यांची नुकसानभरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास अधिकाऱ्यांना अडचण येत आहे. याकरिता यावर्षी ड्रोन कॅमेऱ्यामार्फत नवीन नाल्याच्या बाजूंनी आजपासून सर्व्हेक्षणला सुरुवात करण्यात आली आहे. तेंव्हा नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे बेळगाव शेतकरी संघटनाकडे येत्या 31 जूनपर्यंत जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.