belgaum

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक येथील पर्यटकांचे आकर्षण असलेला गोकाकचा धबधबा अर्थात गोकाक फॉल्स सध्या ओसंडून वाहत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा हा कर्नाटकचा नायगरा म्हणून प्रसिद्ध आहे. आता लवकरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या धबधब्यावरील जुन्या पुलाच्या ठिकाणी काचेचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना जवळून गोकाकचा धबधबा पाहता येणार आहे.

bg

गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीची पाण्याची पातळी वाढली असून गोकाक फॉल्स ओसंडून वाहत आहे. बेळगाव शहरापासून 60 कि. मी. अंतरावर गोकाकचा धबधबा आहे. गोकाक शहरापासून धबधब्याचे अंतर 10 कि. मी. असून 170 फूट उंचीवरून खाली कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे.belgaum-gokak-falls-belgavkar

हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचींमलकी धबधबा ही तीन पर्यटन स्थळे एकमेकापासून साधारण 30 कि. मी. अंतरावर आहेत. घटप्रभा नदीवरील हा धबधबा देशविदेशातील पर्यटकांचाही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सदर धबधब्यावर झुलता पूल देखील आहे.

मात्र 2019 मध्ये आलेल्या पुरामुळे या पुलाचे नुकसान झाल्याने तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. आता या धबधब्यावरील जुन्या पुलाच्या ठिकाणी काचेचा पूल बांधण्यात येणार आहे. सध्या रात्रंदिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोकाक फॉल्स ओसंडून वाहत आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळण्याची शक्यता आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.