Saturday, April 20, 2024

/

‘बुधवारी बेळगाव पोलिसांनी केली ही कारवाई’

 belgaum

बेळगाव पोलिसांनी लॉक डाऊन कालावधीत नियम भंग करणाऱ्या विरूध्द आपली मोहीम सुरू ठेवली असून बुधवारी ३७ वाहने जप्त केली आहेत.

विना मास्क फिरणाऱ्या २९९ व्यक्तीवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. काकती पोलिसांनी देखील कोरोना नियमभंग केल्या प्रकरणी सुळगा येथील मातोश्री किराणा स्टोअर्स चे मालक भाऊराव कलखांब कर याच्यावर गुन्हा दखल केला आहे.

टिळक वाडी पोलिसांनी काँग्रेस रोडवरील हॉटेल करीम किचन चे मालक करीम सय्यद हबीब यांच्यावर गुन्हा दखल केला आहे.

बेळगावात 14 बळी
बुधवारी बेळगावात कोरोनाने 14 जणांचे बळी गेले आहेत.26 मे बेळगाव जिल्हा कोरोना अहवाल-1205 नवे पॉजिटिव्ह रुग्ण 692 डिस्चार्ज तर एका दिवसात कोरोनाचे 14 बळी एकूण मयत संख्या 497

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.