Tuesday, April 23, 2024

/

‘यांनी’ सीमेपलीकडे जपली सामाजिक बांधिलकी

 belgaum

महाराष्ट्रातून बेळगावला अनेकदा मदत मिळाली आहे. तशी बेळगावातून एक छोटीशी मदत महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मिळाली आहे. माजी आमदार कै. संभाजी पाटील यांची श्नुषा साधना सागर पाटील यांनी सीमेपलीकडील एका कुटुंबाला मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात गेली कित्येक वर्षे एकमेकांना मदत केली जात आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावासियांसाठी 05 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देऊ केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरला 11 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत केली आहे.

या पद्धतीने सीमेपलीकडील ऋणानुबंध कित्येक वर्ष जपले जात आहेत. महाराष्ट्रातून बेळगावला अनेकदा मदत मिळाली आहे. तशी बेळगावातून एक छोटीशी मदत महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मिळाली आहे.

 belgaum

माजी आमदार कै. संभाजी पाटील यांच्या स्नुषा साधना सागर पाटील यांनी सीमेपलीकडील एका कुटुंबाला ही मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. बेळगाव शहरात अनेक एक जण सामाजिक मदत करत आहेत. मात्र साधना यांनी बेळगाव सीमेपलीकडे असणाऱ्या एका कुटुंबाला छोटीशी मदत केली असून परशराम दिघे यांचे ते कुटुंब होय.Grossary help

परशराम दिघे कुटुंबीय वायरिंग कामासाठी बेळगावात आले होते. सदर सहा जणांच्या कुटुंबाला लॉक डाऊन लागू झाल्याने इचलकरंजी येथे स्थलांतरित व्हावे लागले. मात्र बेळगावात काम असल्यामुळे त्यांचे इचलकरंजीत हाल होत होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

बेळगाव शहापुर भागांतील एका सामाजिक कार्यकर्त्या मार्फत ही बाब साधना पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ दिघे कुटुंबाला मदतीचा हात दिला. साधना पाटील यांनी दिघे कुटुंबाला दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्याची तात्काळ व्यवस्था केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.