Thursday, April 25, 2024

/

बेळगावात डेव्हलप झाले पाहिजे ‘मुंबई मॉडेल’ : डॉ. माधव प्रभू

 belgaum

बेळगावात ‘मुंबई मॉडेल’ डेव्हलप झाले पाहिजे. ‘तपासणी -उपचार -तपासणी -उपचार’ हे चक्र सुरू राहिले पाहिजे, तरच कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल. मुंबई महापालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी हे करून दाखविले आहे. त्यामुळे तेच मॉडेल बेळगावमध्ये डेव्हलप झाले पाहिजे, असे स्पष्ट मत फ्रंटलाईन कोविड वॉरियर आणि कोविड तज्ञ डॉ. माधव प्रभू यांनी व्यक्त केले.

कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत झालेल्या चिंताजनक वाढीच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग कसा रोखता येईल? यासंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना डॉ. प्रभू यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणणाऱ्या मुंबई मॉडेलचे सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केले असल्याचे सांगून डाॅ. माधव प्रभू पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी असे नियोजन केले की एकवेळ लाखोच्या घरात असलेली मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या आज बेळगाव पेक्षाही कमी आहे. त्यांनी असे काय तिकडं केलं की जे आपण इकडे चुकीचे करत आहोत, हे समजून घेतले पाहिजे. सत्तेचे जसे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक असे जे विकेंद्रीकरण होते तसे महापालिकेचे विकेंद्रीकरण करताना चहल यांनी बीएमसीचे विघटन करून 7 बीएमसी तयार केल्या. म्हणजे मुंबईतील महापालिकेच्या वाॅर्डांचे एक -एक याप्रमाणे त्यांनी 7 बीएमसी तयार केल्या. या सात बीएमसीच्या प्रमुखाला म्हणजे नोडल अधिकाऱ्याला मुंबईच्या आयुक्त इतकेच अधिकार दिले.

आज बेळगावात कोरोना चांचणीसाठी केएलई हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल किंवा लेक व्ह्यू हॉस्पिटल याठिकाणी धावाधाव करावी लागते.

 belgaum

Madhav prabhu

मात्र आयुक्त चहल यांनी मुंबईतील वॉर्डांच्या क्लस्टरमध्येच कोरोना तपासणी केंद्रे सुरू केली. आज त्या ठिकाणच्या सात बीएमसीमध्ये सात ठिकाणी कोरोना तपासणी सुरू आहे. साध्या गल्लीत देखील कोणाला काही आजार झाल्यास कोरोनाची शहानिशा करण्यासाठी त्याला पटकन तपासणी आणि त्यामागोमाग उपचार त्या ठिकाणी उपलब्ध होतात. या पद्धतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणी -उपचार -तपासणी -उपचार हे चक्र फिरत राहिले पाहिजे हा यामागचा मूळ उद्देश होय. हे मुंबई मॉडेल आज बेळगावातील 58 वॉर्डांमध्ये राबविणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रभू यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती पाहता बेळगावात ऑक्सीजन बेड्स वाढविले पाहिजेत. प्रत्येक केंद्रात 50 पैकी 10 बेड्स ऑक्सिजनचे असले पाहिजेत. कोरोनाग्रस्तांना भेटून त्यांना धीर दिला पाहिजे आणि सौम्य लक्षण असतील त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला पाहिजे असे सांगून ज्याला ‘ऑक्सीजन ऑडिट’ म्हणतात ते ऑक्सिजनच्या बाबतीतील योग्य नियोजन झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी त्याला डाव्या कुशीवर एकदा, मग पोटावर, मग उजव्या कुशीवर आणि मग बसून असे 30 -30 मिनिटाचे चक्र अर्थात सायकल दिवसातून सात-आठ वेळा केले पाहिजे, असे मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून डॉ. माधव प्रभू यांनी ऑक्सिजन मास्क कशा पद्धतीने वापरावा याबाबतची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.