belgaum

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्थात एडीजीपी भास्कर राव हे बेंगलोर येथून वेळोवेळी आवश्यक मोलाच्या सूचना देण्याद्वारे बेळगावातील लॉक डाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

एडीजीपी भास्करराव बेंगलोरमधून वेळोवेळी सूचना देत असून त्याची अंमलबजावणी बेळगावात होत आहे. लॉक डाऊनच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी म्हणून एडीजीपी भास्कर राव यापूर्वी बेळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी बेळगाव पोलिसांना कशा पद्धतीने जबरदस्ती अथवा दंडेलशाही न करता लाॅक डाऊन यशस्वी करावा याबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू आहे.

bg

बॅरिकेड्स असोत किंवा इतर समस्या असोत बेळगावातील अनेक सामाजिक संस्था, वृत्तपत्रे सोशल मीडिया यांना ट्विटरद्वारे माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच भास्कर राव हे बेळगाव पोलिसांनाही मार्गदर्शन आणि सूचना करत आहेत. त्यामुळे सध्याच्या लॉक डाऊनमध्ये सोशल मीडियाची अशा पद्धतीने उत्तम मदत होत आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक या उच्च पदावर असून देखील बेळगावच्या सर्वसामान्य माणसांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल सोशल मीडियावर केलेल्या तक्रारींची दखल भास्करराव घेत आहेत हे विशेष होय.

यापूर्वी मराठा मंदिर नजीकच्या रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजच्या रस्त्यावरील बॅरिकेड्सच्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली होती. तसेच आज जेएनएमसी रोडवरील बॅरिकेड्सबद्दलच्या तक्रारीची दखल राव यांनी घेतली आहे. एकंदर एडीजीपी भास्कर राव हे ट्विटरवर ॲक्टिव्ह असून त्याद्वारे आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ते अधिकाऱ्यांना सूचना देताना दिसत आहेत.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.