Thursday, April 25, 2024

/

वीज कोसळून दोघा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

 belgaum

पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबलेल्या दोघा कामगारांवर वीज कोसळल्याने दोघेही मृत्यूमुखी पडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी कणबर्गी रोडवरील सुरभी हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर घडली.

भरमाप्पा बहाद्दरवाडी (वय 35) आणि प्रकाश व्यापारगी (वय 45) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्देवी कामगारांची नांवे आहेत. आज दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने हे दोघेजण झाडाखाली आडोशाला थांबले होते.

मात्र नेमकी त्याचवेळी त्या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे भरमाप्पा आणि प्रकाश हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले.

 belgaum

त्यांना तातडीने सिव्हील हॉस्पिटलकडे नेण्यात येत असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. माळमारुती पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.