Sunday, May 5, 2024

/

केपीसीसी कार्याध्यक्षांच्या गनमॅनचा कोरोनाने मृत्यू

 belgaum

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या गनमॅनचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

गनमॅन रमेश (वय 43) यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रमेश हे गेल्या दहा वर्षांपासून आमदार सतीश जारकीहोळी यांचे गनमॅन म्हणून काम पहात होते.

 belgaum

सतीश जारकीहोळी मंत्री असताना त्यांचे सुरक्षारक्षक असलेल्या रमेश यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर बंगळूर येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.