Wednesday, April 24, 2024

/

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा उद्या तातडीचा बेळगाव दौरा

 belgaum

राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उद्या मंगळवार दि. 30 मार्च 2021 रोजी एक दिवसाच्या तातडीच्या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव प्रवास दौऱ्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा उद्या मंगळवारी सकाळी 11:35 वाजता बंगलोरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास इंडिगो विमानाने (क्र. 6 ई -7181) बेळगावच्या दिशेने प्रयाण करतील.

बेळगावच्या सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे दुपारी 1:15 वाजता आगमन होईल. त्यानंतर बेळगाव येथे शहर आणि ग्रामीण जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील.

 belgaum

सदर कार्यक्रम आटपून पुन्हा सायंकाळी 5:55 वाजता इंडिगो विमानाने (क्र. 6 ई -7182) मुख्यमंत्री बेंगलोरला रवाना होती. बेंगलोरच्या केंपेगौडा विमानतळावर ते रात्री 7:25 वाजता पोहोचतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.