महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण

0
 belgaum

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…

जग पुढे गेले असले तरीही अजून महिलांवरील अन्यायाची परिभाषा मात्र बदलली नाही. तळागाळातील समाजात आजही त्याचपद्धतीने महिलांवर अत्याचार होतात. जग पुढे जात आहे आणि कायद्याची साथ असल्यामुळे महिला आता अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत.

bg

त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्यातरी मदतीच्या हाताची अपेक्षा असते. असाच मदतीचा हात पुढे करणाऱ्या बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्या झुबेदाबी पठाण. जाती – धर्मापलीकडे जाऊन प्रत्येक महिलेच्या अडीअडचणीत या वयातही तितक्याच हिरीरीने धावून जात समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.Zubedabi pathan

बेळगावच्या मानवाधिकार लोककल्याण भ्रष्टाचार मुक्त समितीच्या माध्यमातून २००६ सालापासून त्या कार्यरत आहेत. सदस्यपदी नेमणूक झालेल्या झुबेदाबी पठाण यांच्या कार्याची दखल घेत २०१३ साली त्यांची शहर महिला अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. आजतागायत त्यांनी गोरगरिबांपर्यंत पेन्शन योजना, वृद्ध पेन्शन योजना, सरकारी योजना, रेशन कार्ड, महिलांसाठी असणाऱ्या विविध सुविधा त्यांनी पोहोचविल्या आहेत.

अनेक ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील कौटुंबिक अत्याचारावर आवाज उठवून अन्याय – अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून दिला आहे. पोलीस विभागाशी संपर्क साधून त्या त्या वेळी होणाऱ्या वाईट गोष्टींविरोधात आवाज उठविला आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर, आरोग्य जनजागृती शिबिरांचे आयोजन केले आहे. चिकोडी, बैलहोंगल, संकेश्वर, हुबळी, दांडेली अशा भागात जाऊन तेथील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण केले आहे.

सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा संदेश घेऊन प्रत्येकाने माणुसकीने जगण्याचा संदेश त्या आजतागायत देत आल्या आहेत. वयाने मोठया असल्या तरी त्यांचा इतरांना मदत करण्याचा उत्साह मात्र तरुणांनादेखील लाजवेल असाच आहे. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीला ‘बेळगाव लाईव्ह’ चा सलाम आणि पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.