Saturday, April 20, 2024

/

‘नियती’ने केला कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान

 belgaum

बेळगांव येथील नियती फौंनडेशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या १२ कर्तबगार स्रियांचा ‘सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार ‘देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम बेळगांव येथील ईफा हॅाटेलच्या सभागृहात पार पडला .

कार्यक्रमाची सुरवात अर्चना संगीत विद्यालयाच्या विघ्यार्थीनींनी सरस्वती वंदना सादर करुन केली. ‘ मुलगी झाली हो ‘ ह्या लोकप्रिय भारुडाच्या सादरीकरणाने तर सर्व श्रोत्यांची मन जिंकली .

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव येथील सुप्रसिद्ध उद्योजिका सौ.रोहिणी गोगटे व जी जी चिटणीस शाळेच्या मुख्याद्यापिका श्रीमती नवीना शेट्टीगार उपस्थित होत्या.

नियती फौंनडेशनच्या अध्यक्षा डॅा.सौ.सोनाली सरनोबत यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच व उपस्थित सर्वांच स्वागत करण्यात आले , आपल्या स्वागतपर भाषणात डॅा. सोनाली सरनोबत यांनी नियती फौंनडेशनच्या कार्याची ओळख करुन दिली.

यानंतर सर्व पुरस्कर्रत्यांची ओळख श्री. किशोर काकडे व शर्मिला संभाजी यांनी करुन दिली. सर्व पुरस्कारप्राप्त महिलांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले व आपले कार्य करत असताना आलेले अनुभव कथन केले.Niyati womens day

प्रमुख पाहुणे ह्या नात्याने उपस्थित असलेल्या उद्योजिका सौ. रोहिणी गोगटे व श्रीमती नवीन शेट्टीगार यांनी सर्व पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन केले व नियती फौंनडेशनच्या ह्या स्तुत्य कार्याचा व समाजाभिमुख विविध उपक्रमांचा गौरव आपल्या भाषणात केला.

आज महिला दिनाच औचित्य साधुन समाजातील दहा गरजु महिलांचा एक सामाजिक भान जपत प्रतिकात्मक रितीने शिवणयंत्र देऊन गौरव करण्यात आला.

ह्या सर्व महिला दुर्गम भागातील असल्यामुळे सदर कार्यक्रमाला त्या उपस्थित राहु शकल्या नाहीत, तरी ही सर्व शिवणयंत्रे येत्या आठवड्यात त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येतील.

नियती फौंनडेशनच्या सचिव सौ. मोनाली शहा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले . ‘ वंदे मातरम ‘ गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महिला आणि युवा सक्षमीकरणाच्या अतुल्य कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार : वैजयंती चौगुला, पोलीस दलातील असामान्य सेवा : यशोदा वंटगोडी, संगीत क्षेत्रातील योगदान : अर्चना बेळगुंदी,समाज सेवेचे कार्य : प्रतिभा आपटे, भरतनाट्यम क्षेत्रातील योगदान : रेखा हेगडे, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील योगदान : कीर्ती शिवकुमार, वन आणि प्राणी संवर्धन : रोहिणी पाटील, शिक्षण क्षेत्रातील योगदान : स्वाती जोग, सामाजिक कार्य : सुरेखा पाटील आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान : मैत्रयी संगम बैलुर.  या महिलांचा सन्मान झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.