belgaum

विद्युत खांबावर झाड कोसळल्याने मोठी हानी

0
219
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगावमधील हिंडाल्को क्रॉस ब्रिज परिसरात मोठे झाड विद्युत खांबावर कोसळल्याने दोन ते तीन वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेमुळे केएलईकडून सर्विस रस्त्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

हिंडाल्को क्रॉस ब्रिजजवळ रस्त्याकडेला असलेले एक भले मोठे झाड अचानक विद्युत खांबावर कोसळले. झाडाचा भार पेलू न शकल्याने एकापाठोपाठ एक असे दोन ते तीन विद्युत खांब मोडून पडले आहेत.

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी केएलई हॉस्पिटलकडून सर्विस रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर झाड पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

 belgaum

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. तसेच इस्कॉनचे लाईनमन देखील तातडीने दाखल झाले असून मोडून पडलेले खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. या भागातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.