Sunday, May 5, 2024

/

24 तास दिलासादायक; आढळले फक्त 3 रुग्ण : 27,207 झाले एकूण रुग्ण

 belgaum

गेले 24 तास बेळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरले असून या कालावधीत जिल्ह्यात फक्त 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,207 झाली असून आतापर्यंत 26,685 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज सोमवार दि. 22 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,60,200 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 22,168 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 180 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 25,305 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,12,547 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,59,108 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,207 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज सोमवारी नव्याने आढळलेल्या 3 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,27,001 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 180 आहेत. त्याचप्रमाणे 1,881 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

 belgaum

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,685 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज सोमवारी आढळलेल्या तीन कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये गोकाक, खानापूर व सौंदत्ती तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.