belgaum

भाग्यनगरात झाड कोसळून कारचे मोठे नुकसान

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागांत आपत्तीजनक घटना घडत आहेत. सोमवारी सकाळी भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे एक मोठे झाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सततच्या पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाल्याने ते अचानक उन्मळून पडले. अपघाताच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र कारचे मोठे नुकसान झाले.

झाड कोसळताना त्यासोबत वीजवाहिन्या आणि वीजेचा खांबही खाली आल्याने भाग्यनगर परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 belgaum

त्यांनी तातडीने झाड हटवून वीजवाहिन्या सुरक्षित केल्या तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. या कामात स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.

दरम्यान, सततच्या पावसामुळे शहरात झाडे कोसळणे, घरांचे नुकसान होणे आणि रस्त्यांवर पाणी साचणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. धोकादायक अवस्थेतील झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.