Thursday, April 18, 2024

/

सक्रीय रुग्ण संख्येने गाठले द्विशतक : नव्याने आढळले 39 रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 39 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,414 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 208 इतकी वाढली आहे

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज बुधवार दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,83,937 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 32,922 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 208 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 24,007 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,26,800 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,82,845 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,414 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज बुधवारी नव्याने आढळलेल्या 39 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,50,239 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 208 आहेत. त्याचप्रमाणे 2,040 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

 belgaum

जिल्ह्यात आतापर्यंत 344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,862 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज बुधवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 33, चिक्कोडी 3, गोकाक, खानापूर व सौंदत्ती प्रत्येकी 1 अशा एकुण 39 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.