belgaum

हलगा येथील ‘विज्ञान वन’ला मंत्री ईश्वर खंड्रे यांची भेट

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वर खंड्रे यांनी गुरुवारी सुवर्णसौध परिसरातील **हलगा येथील ‘विज्ञान वन’**ला भेट देऊन विविध विज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी मुलांना आणि सर्वसामान्य नागरिकांना खेळता-खेळता विज्ञानाची माहिती मिळावी यासाठी विज्ञान वनात उभारण्यात आलेल्या विविध उपकरणांचे त्यांनी कौतुक केले. तसेच विज्ञान वन परिसरात वृक्षारोपण करून रोपाला पाणीही घातले.

जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी विज्ञान वनाची संकल्पना, वैशिष्ट्ये आणि येथे उपलब्ध असलेल्या विविध विज्ञानाधारित सुविधांची माहिती मंत्री खंड्रे यांना दिली.

 belgaum

यावेळी आमदार गणेश हुक्केरी, जिल्हा पंचायत उपसचिव (विकास) बसवराज अडविमठ, उपवनसंरक्षक राजेश्वरी ईरनट्टी, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनाथ कडोलकर, विभागीय वनाधिकारी गिरीश इटगी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.