Wednesday, April 24, 2024

/

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

 belgaum

मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती तर त्या दिवसापासून आतापर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसापूर्वी थंडी तर दोन दिवसांपासून गरमीला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्रीपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

या ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकरी चिंतेत अडकले आहेत. सध्या कडधान्य पिके काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे अनेक पिके खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे येल्लूर व इतर भागातील कडधान्य पिके खराब झाली होती.

आता पुन्हा जर पाऊस पडला तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा अशी मागणी शेतकर्‍यांतून व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पडलेल्या पावसामुळे हरभरा मसूर वाटाणा यासह इतर पिके खराब झाली होती.

 belgaum

आता जर पुन्हा पाऊस पडला तर अनेक कडधान्य पिके असलेली ती खराब होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती तर अजूनही ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी कडधान्य पिके वाचविण्यासाठी धडपड करत आहेत.

त्यामुळे हा पाऊस अनेक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरला आहे. दरम्यान अवकाळी पाऊस मे महिन्यानंतर येतो मात्र फेब्रुवारीतच या पावसाचे आगमन झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.