Friday, April 26, 2024

/

कार -दुचाकी अपघातात काकतीचा विद्यार्थी ठार

 belgaum

कार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी केएलई रोडवरील केएफसीसमोर घडली.

साईराज संभाजी कडोलकर (वय 22, रा. काकती) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. साईराज हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता.

शहरातील आरएलएस महाविद्यालयामध्ये त्यांनी यंदा बीएससीसाठी ऍडमिशन घेतले होते. साईराज आपल्या दुचाकीवरून आज दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून काकतीच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी जिल्हा क्रीडांगणाकडून मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या कार गाडीला त्याने जोराची धडक दिली.Sairaj kadolkar

 belgaum

ही धडक इतकी जोराची होती की साईराज याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी रहदारी उत्तर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, शहरातील दुचाकी अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.