Thursday, April 25, 2024

/

तो परदेशी व्यक्ती सांगतोय….मी देव आहे!

 belgaum

बेळगावमध्ये दिवसेंदिवस अनेक चकित करण्याऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या बातम्यांमध्ये आता नवी भर पडली आहे ती एका परदेशी व्यक्तीची.

तालुक्यातील कणबर्गी गावाजवळ असलेल्या बसस्थानकात एक परदेशी व्यक्ती वास्तव्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सदर व्यक्ती बसस्थानकावर आसरा घेत असून मनोरुग्ण वाटणाऱ्या या व्यक्तीला विचारणा केली असता मी देव असल्याचे सदर व्यक्ती सांगत आहे. त्याच्या या वागणुकीची बाब कणबर्गी गावात चांगलीच चर्चेत येत आहे.

सदर व्यक्ती हि जर्मनी या देशातून आली असल्याची माहिती मिळाली असून गोव्याहून भटकत आलेली हि व्यक्ती कणबर्गी गावात येऊन पोहोचली आहे. मागील दोन आठवड्यांपासून बसस्थानकावर ठाण मांडून बसलेला हा परदेशी पर्यटक भाकरी ऐवजी सफरचंद खात आहे. आणि ग्रामस्थही या व्यक्तीला भाकरी ऐवजी सफरचंद देत आहेत. या व्यक्तीला ‘हू आर यु?’ असा प्रश्न विचारण्यात आला तर ‘आय अँम गॉड’ असे उत्तर हा परदेशी पर्यटक देत आहे.Foreignour

 belgaum

त्याच्या या वागणुकीची ग्रामस्थांना द्या येत असून हि व्यक्ती मानसिक संतुलन बिघडलेलीही जाणवत आहे. शिवाय याची भाषाही वेगळीच असल्याने प्रत्येक गावकऱ्यांकडून आपापल्यापरीने याची चौकशी करण्यात येत आहे. शेवटी शहर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी या परदेशी व्यक्तीला भेटून त्याची विचारपूस केली.

या दरम्यान हि व्यक्ती न्यूझीलंडची असल्याचे समोर आले आहे. बंगळुरमार्गे न्यूझीलंड येथे जाण्यासाठी आलेली सदर व्यक्ती हि कणबर्गी येथे पोहोचली. आपल्या पत्नीला व्हॉट्सअप द्वारे संपर्क करण्यासाठी त्यांनी आमदारांना विनंती केली आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीशी संपर्क साधला.

सदर व्यक्तीला मदतीची गरज असून तो आपल्या देशात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कणबर्गी ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.