Wednesday, April 24, 2024

/

1.5 कोटी खर्चून कॅन्टोन्मेंट मैदानाचे आधुनिकीकरण

 belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानाला सिंथेटिक लॉन आणि रनिंग ट्रॅक घालून आधुनिक स्वरूप देण्याच्या सुमारे 1.5 कोटी खर्चाच्या विकास कामाला आज झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसामान्य बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसामान्य बैठक आज शनिवारी सकाळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ वर्चस्व यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये दर्जेदार क्रीडापटू घडावेत यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेसमोरील मैदानाचे आधुनिकीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी सदर मैदानावर सिंथेटिक हिरवळ (लॉन) आणि रनिंग ट्रॅक घालण्याच्या सुमारे 1.5 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

त्याप्रमाणे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी गोगटे सर्कल येथील उद्यानाचा विकास साधण्याचा जो प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला बैठकीत मंजुरीसह उद्यानाचा विकास साधण्यास परवानगी देण्यात आली. याखेरीज आमदार निधीतून कॅम्प फिश मार्केट येथील जुनी इमारत पाडून त्याठिकाणी आधुनिक नवीन इमारत बांधण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखविण्यात आला.Catonment board bgm

 belgaum

बेळगाव लायन्स क्लबकडून पोस्टमन रोड या दुपदरी मार्गावरील दुभाजकाची रंगरंगोटी, ग्रिल बसविणे, दुभाजकावरील फुलझाडांच्या कुंड्यांचे संवर्धन करण्याची जी योजना आहे, त्या योजनेला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त अध्यक्षांच्या परवानगीने अन्य काही विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

सदर बैठकीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष निरंजना अष्टेकर, सदस्य साजिद शेख, अल्लाउद्दीन किल्लेदार, रिजवान बेपारी, डॉ. मदन डोंगरे, अरेबिया धारवाडकर, विक्रम पुरोहित आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.