Tuesday, May 7, 2024

/

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला “यांनी” दिली शववाहिका भेट

 belgaum

कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला शववाहिका देणगीदाखल दिली. या शववाहिकेचा उद्घाटन समारंभ आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला.

कॅम्प येथील बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालय आवारात आज सकाळी बोर्डाचे सीईओ बर्चस्वा यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढविण्याद्वारे शववाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी, बोर्डाचे सदस्य व देणगीदार साजिद शेख, राहिला शेख, बोर्डाच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, अल्लाउद्दीन किल्लेदार, रिजवान बेपारी, मदन डोंगरे, अरेबिया धारवाडकर, विक्रम पुरोहित, ऑफिस सुपरिटेंडेंट टाळूकर, सतीश मन्नूरकर आदीं उपस्थित होते.

माहितीच्या उद्घाटनानंतर बोलताना ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी जनसेवेसाठी शववाहिका देणगीदाखल देणाऱ्या साजिद शेख यांची प्रशंसा केली. तसेच या शववाहिकेचा जनतेला खूप फायदा होईल असेही ते म्हणाले. यावेळी मदन डोंगरे यांच्यासह बोर्डाच्या अन्य सदस्यांनी साजिद शेख यांचे कौतुक करून शववाहिकेसाठी त्यांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे समस्त जनतेच्यावतीने ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसतर्फे साजिद शेख आणि सीईओ बर्चस्वा यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.Sajid shaikh herse van

 belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य देणगीदार साजिद शेख याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्व जातीधर्मांच्या लोकांची गैरसोय होत होती. लोकमान्य किंवा महापालिकेची शववाहिका उपलब्ध व्हायची, परंतु तिला यायला उशीर होत होता.

याव्यतिरिक्त माझ्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक शववाहिका देणगीदाखल दिलीच पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा होती. त्याची पूर्तता आज झाली आहे असे सांगून ही शववाहिका ठरावी एका समाजासाठी नसून सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी उपलब्ध असेल असेही शेख यांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/375504746140458/posts/1315180652172858/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.