Sunday, April 28, 2024

/

हल्ला प्रकरणी तिघांना अटक; खडेबाजार पोलिसांची कारवाई

 belgaum

बेळगाव परिसरातील स्टेशन रोडवरील दोघांवर हल्ला करणाऱ्या तिघांना खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक कार, एक बाईक आणि दोन शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चव्हाट गल्ली येथील प्रफुल बाळकृष्ण पाटील, समर्थ नगर येथील रोहित रेणके, नानावाडी येथील सागर इलियास, शैलेश जानगवळी यांचा समावेश आहे. किरकोळ कारणातून निलेश काकतकर, शंकर भजंत्री यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. Khade bazar

खडेबाजार पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक दुचाकी, एक चारचाकी, आणि दोन तलवारी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 belgaum

खडेबाजार पोलीस ठाण्याचे एसीपी चंद्रप्पा, सीपीआय धीरज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, उज्जनकोप्प आणि इतर सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून खडेबाजार पोलिसांनी  केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.