गणपत गल्ली ही नेहमीच गजबजलेली बाजारपेठ. या बाजारपेठेत आज एका दुचाकीस्वाराने फिल्मी स्टाईलने गोंधळ माजविला. भर बाजारपेठेत वेगाने दुचाकी चालवत, दुचाकीवर गाणी ऐकत येणाऱ्या या दुचाकीस्वाराने गर्दीतील एका बालकाला धडक दिली.
आपल्या कानात लावलेल्या एअरफोन वर गाणी ऐकण्याच्या धुंदीत असणाऱ्या या युवकाला ना गर्दीचे भान होते ना ना आपण दिलेल्या धडकेने भान होते. या धडकेत बालकाच्या अंगावरून दुचाकी गेली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या प्रकारानंतर बघ्यांची गर्दी वाढली. परंतु याच गर्दीचा फायदा घेत आणि नागरिकांच्या संतापाला सामोरे जाण्याच्या भीतीने या दुचाकीस्वाराने येथूल पळ काढला.
या अपघातात जखमी झालेल्या बालकाचे नाव वरुण विठ्ठल कांबळे (वय ४ वर्षे, असे असून पंचनगर, बेळगाव) असे आहे. सदर बालक अपघातात मोटारसायकल खाली अडकले. आणि काही अंतरापर्यंत तसेच फरफटत गेले.
सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारावेळी सदर दुचाकीस्वाराच्या कानात हेडफोन्स असलेले नागरिकांनी पहिले. या अपघातात बालकाला गंभीर दुखापत झाली आहे. रहदारी पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने त्या जखमी मुलाला शनिवार खूट येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून अपघातानंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.