Wednesday, May 1, 2024

/

तुमचा खेळ बंगळूरूत करा- बसनगौडा पाटील यत्नाळ

 belgaum

तुमचा खेळ बेंगळुरात करा.. इथे तुमचे कांही चालणार नाही… शिवाजी न होते तो सुन्नत सबकि होती…. अशी महती शिवरायांची सांगितली जाते हे विसरू नका. विधानसभेत हक्कभंग आणून तुमची खरडपट्टी करण्यास मला वेळ लागणार नाही, असा सज्जड इशारा विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी वाटाळ नागराज आणि कन्नड संघटनांना दिला आहे.

मराठा विकास महामंडळामुळे पोटशूळ उठलेल्या वाटाळ नागराज आणि कन्नड संघटनांनी उद्या 5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे, याच्या विरोधात आमदार पाटील -यत्नाळ यांनी नुकतीच आपल्या समर्थकांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी वाटाळ नागराज व कन्नड संघटनांच्या विरोधात हल्लाबोल केला.basanagouda-patil-yatnal-

बसनगौडा पाटील -यत्नाळ यांचा जन्म मराठा कुळात झाला आहे, असे सांगून टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मी सांगू इच्छितो की होय मी मराठा आहे, असे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ म्हणाले. कन्नड मराठा नांवाखाली हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न वाटाळ नागराज यांच्यासारखे नेते करत आहेत, अशी टीका देखील आमदार पाटील -यत्नाळ यांनी केली.

 belgaum

दरम्यान, मराठा विकास महामंडळाला विरोध करत बंद पुकारणाऱ्या कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बेळगांव पोलीस खात्याने नोटीस बजावली आहे. परवानगीशिवाय कोणतीही कृती केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा उल्लेख नोटिशीत करण्यात आला आहे.

पूर्वपरवानगीशिवाय मोर्चे, निदर्शने, मेळावे आदी कोणतेही पाऊल उचलू नये, असा सक्त इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.