Saturday, May 4, 2024

/

मद्यपीच्या मर्कट चेष्टा : वीर संगोळी रायाण्णांच्या पुतळ्याचा अवमान

 belgaum

पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवण्यात आलेल्या देशभक्त वीर संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याचा एका मद्यपीने केलेल्या अवमानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आज सोमवारी दिवसभर चर्चेचा विषय झाला होता.

पिरनवाडी येथील चौकात चौथऱ्यावर बसविण्यात आलेल्या वीर संगोळ्ळी रायाण्णा यांच्या या पुतळ्यावर आज एक मद्यपी इसम चढला होता. चक्क पुतळ्याच्या डोक्यावर पाय देऊन उभा असणाऱ्या या मद्यपिला लोकांनी काठीने मारून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी मर्कटलीला करणारा हा मद्यपी शेजारी असलेल्या ध्वजावर चढून बसला. अखेर जमा झालेल्या नागरिकांनी कसेबसे त्याला खाली उतरवून चांगला चोप दिल्याचे कळते.

 belgaum

सदर प्रकार घडला त्यावेळी चौकात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. एकामध्ये मद्यपीने घातलेल्या या गोंधळाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आज दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता. तसेच संबंधित मद्यपी इसमावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वीर संगोळी रायन्ना हे देशभक्त आहेत त्यामुळे देशभक्ताच्या अवमानाचा व्हीडिओ व्हायरल करणे देखील चुकीचे असून कुणीही तसा व्हीडिओ व्हायरल करू नये मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.