Saturday, April 20, 2024

/

विनय कुलकर्णी हिंडलगा जेलमध्ये शिफ्ट

 belgaum

धारवाड येथील योगेशगौडा यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या धारवाड येथील नेते विनायक कुलकर्णी यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

धारवाड येथील तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार विनय कुलकर्णी यांना अटक केली आहे. धारवाडच्या तिसऱ्या अतिरिक्त न्यायालयासमोर हजर केले असता विनायक कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश बजावण्यात आला आहे.

योगेशगौडा यांच्या खून प्रकरणी यापूर्वी सहा आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांना धारवाडच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून त्याच ठिकाणी विनायक कुलकर्णी यांना न ठेवता हिंडलगा कारागृहामध्ये त्यांना हलविण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे उर्वरीत तपासासाठी त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला जाणार असल्याचेही कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.