belgaum

बेळगावची अभिनेत्री आणि बेग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर हि नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सई लोकूर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती.

सईच्या लग्नापूर्वीचे अनेक विधींचे फोटो स्वतः सईने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये साईच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता होती. तीर्थरूप रॉय या सिनेनिर्मात्याशी सईने लग्न केले असून तिच्या विवाहसोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.

बिग बॉस नंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या सतत संपर्कात होती. तिच्या लाईफ पार्टनर बाबतीत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच तिने लग्नापूर्वीचे फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणले होते. सई आणि तीर्थरूप रॉय यांचे लग्न बेळगावमध्येच पार पडले असून सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि विवाहसोहळ्यात प्रत्येक विधीचे फोटोज सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

आज सकाळी ९.५४ वा. सई आणि तीर्थरूप हे विवाह बंधनात अडकले आहेत. कलर्स वाहिनी वरील बिग बॉस या रिऍलिटी शोमधून सई प्रेक्षकांच्या भेटीस नव्या स्वरूपात आली होती. तिचा बिग बॉस मधील सहभाग प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडला होता. बिग बॉसचे पहिले पर्व तयारी स्पर्धकांमुळे खूप चर्चेत आले होते. यामाध्यमातून सईने स्वतःचा असा स्वतंत्र फॅनक्लब निर्माण केला होता.

सईने शोधलेला आपला जीवनसाथी हा एका मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून निवडला असून याआधी मॅट्रिमोनियल साईटवर अनेक मुलांना तिने नाकारल्याचे तिने ‘टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सई हि मूळची बेळगावची असून तिने डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट शाळेत शालेय शिक्षण तर गोगटे महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे. बिग बॉस सह हिंदी चित्रपटातही सईने अभिनय केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.