Monday, April 29, 2024

/

बेळगावात युवकाचा खून…

 belgaum

काही अज्ञात युवकांनी धारधार हत्त्यारांनी हल्ला करून युवकाचा भीषण खून केल्याची रविवारी रात्री शेख हॉस्पिटल जवळ घडली आहे.

खून झालेल्या युवकाचे नाव शहबाज वय 24 रा.आझम नगर बेळगाव असे आहे पूर्व वैमानस्यातून हा खून झाला असावा अशी शक्यता असून नेमकं कोणत्या कारणासाठी खून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.मयत युवकावर अनेक पोलीस स्थानकात खून करण्याचे आरोपाचे गुन्हे आहेत.
दोन वर्षापूर्वी शहबाजने काकती जवळ दोन युवकावर चाकू हल्ला केला होता.

Shahbazगँगवाडी जवळ अज्ञातांनी शहबाजवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले व फरारी झाले त्या नंतर लागलीच त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.युवकांच्या गटाने हल्ला केलेल्या घटनेची दृश्ये जवळील सी सी टी व्ही कैद झाली आहेत.

 belgaum

बेळगाव शहरात युवकाचा खून झाल्याने तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच शेकडो युवकांनी सिव्हिल इस्पितळा समोर गर्दी केली होती या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी प्रहार देखील करावा लागला.

रविवारी मध्यरात्री पर्यन्त जिल्हा रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.माळमारुती पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून खून कश्यासाठी आणि का झाला याचा तपास केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.