Thursday, March 28, 2024

/

दोन चित्रपटांसह बेळगावातील आयनॉक्स झाले खुले

 belgaum

देशात नव्याने घोषित केलेल्या अनलॉक -5 च्या मार्गदर्शक सूचीनुसार आजपासून सर्व चित्रपट गृहे खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बेळगांवात सध्या फक्त आयनॉक्स चित्रपटगृहात थप्पड (हिंदी) आणि शिवाजी सुरतकल (कन्नड) हे दोन चित्रपट सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झाले आहेत. चित्रपटगृहांसाठी असलेला मानक प्रणालीचा (एसओपी) तपशील पुढील प्रमाणे आहे.

चित्रपटगृहातील सभागृह 50 टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेले नसेल यात शंका नाही.सभागृहात आसनस्थ होणाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राखले जावे. ठराविक आसनांवर “बसू नये” हि खूण केलेली असावी. प्रेक्षकांना हँडवॉश आणि सॅनिटायझर उपलब्ध केले जावेत. आरोग्य सेतू ॲप बसून घेण्याचा आणि वापरण्याचा सल्ला देण्यात यावा. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग केले जावे. फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या निरोगी प्रेक्षकांना प्रवेश दिला जावा. प्रेक्षकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आजारी वाटल्यास तसे कळवावे. चित्रपट गृहातील विविध पडद्यावरील चित्रपटांच्या खेळाच्या वेळा स्थिर ठेवाव्यात.

 belgaum

डिजिटल पद्धतीच्या पेमेंट ला प्राधान्य द्यावे. बॉक्स ऑफिस आणि अन्य परिसराची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जावे. बॉक्स ऑफिसवर पुरेसे काउंटर खुले ठेवावेत. मध्यंतराला प्रेक्षक अनावश्यक फिरणार नाहीत याची काळजी घेतली जावी. फ्लॉवर मार्केटिंगच्या ठिकाणी शारीरिक अंतर आणि रांगेचे पालन केले जावे. गर्दी टाळण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंगला परवानगी द्यावी. बॉक्स ऑफिसवरील तिकीट विक्री दिवसभर सुरू ठेवण्यात यावी.Inox theater seats

थुंकण्यास मनाई असेल. श्वसन शिष्टाचाराचे सक्तीने पालन केले जावे. हवाबंद खाद्य पदार्थ आणि पेये यांना परवानगी असेल, मात्र सभागृहात ही परवानगी नसेल. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ग्लोज, बूट, पीपीई आदी पर्याप्त प्रावधान बाळगले जावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे संपर्क क्रमांक घेतले जावेत.

वातानुकूलित यंत्रणेचे तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सिअस इतके ठेवलेले असावे. मास्क, सामाजिक अंतर आणि हाताच्या स्वच्छतेबाबत चित्रपट सुरू होण्यापूर्वी, मध्यंतराला आणि चित्रपट समाप्त झाल्यानंतर जनजागृती केली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.