Friday, May 3, 2024

/

विणकराची आत्महत्या

 belgaum

बेळगाव शहरातील वडगाव येथील देवांग नगरमध्ये भागातील विणकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर ढगे (वय ३५)असे या विणकराचे नाव आहे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मयत संतोष याला कर्ज अधिक झाले होते लॉक डाऊन मध्ये काम बंद असल्याने तो नाराज होता त्यातच निराश होऊ न त्याने आत्महत्या केली असावी असा संशय आहे.

राज्यात आतापर्यंत १४ विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत . सरकारने त्याच्या कुटुंबियांना किमान १० लाख रुपये भरपाई द्यावी. तसेच सरकारने विणकरांच्या समस्या त्वरित दूर कराव्यात अशी मागणी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाने केली आहे .

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.