Thursday, May 2, 2024

/

आत्महत्या करणाऱ्या “त्या” इसमाची ओळख पटली

 belgaum

गोगटे सर्कल नजीकच्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर आज शुक्रवारी सकाळी आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली असून खराब मानसिक स्थितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोगटे सर्कल नजीकच्या रेल्वेवर ब्रिजवर एका वयस्क इसमाने ब्रिजच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

प्रारंभी मयत इसमाची ओळख पटू शकली नव्हती. त्यानंतर चौकशीअंती आत्महत्या करणार्‍या इसमाचे नाव मनोहर लक्ष्‍मण भोसले (वय 65) असे असून तो गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी होता.

 belgaum

मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.