Sunday, September 8, 2024

/

चक्कर येणे -उपचार काय वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

चक्कर या विकारास इंग्रजीत ‘व्हर्टिगो’ असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे.

एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे ‘चक्कर येणे’ या रोगात दिसून येतात.आपल्या कानाच्या आतील बाजूस असलेले ‘लॅबरिथ'(अंतःकर्ण)या भागाशी याचा संबंध असतो.त्या भागाने शरीराचा तोल सांभाळण्याचे काम होते.तो भाग उठ-बस,झोप,उभे असणे किंवा चालणे या शरीरक्रियांचे संदेश मेंदुकडे प्रक्षेपित करतो.या संदेश पाठविण्याच्या क्रियेत काही कारणांनी बिघाड झाल्यास, चक्कर येते.अचानक कमी ऐकु येणे,कानात किणकिणल्यागत नाद होणे.

(DrSonaliArticles)
कानावर आघात झाल्यास,मधुमेह, रक्ताची हानी,तीव्र सर्दी,मानेच्या मणक्याचे आजार किंवा झीज,मद्यावस्था किंवा अती धुम्रपानही याचे कारण असू शकते.उपवासामुळे अन्नात पौष्टिक घटकांचा/शरीरास अन्नाचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता हेही एक कारण असु शकते.वाढते वय.अति विचार, मानसिक चिंता.
www.drsonalisarnobat.com

Vertigo
Vertigo

सावधानता
लांबच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे,अचानक हालचाली टाळणे,उठता-बसतांना सावकाश हालचाली करणे, झोपून उटावयाचे असल्यास सावकाश कुशीवर वळुन,हातावर जोर देउन बसावे व मग सावकाश उभे रहावे.या प्रकाराने मेंदुस संदेश पोचविण्याचे कामात वेळ मिळतो व सर्व ठिकठाक राहते.

उपचार
होमिओपॅथीने हा आजार पुर्ण बरा होतो.
9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.