पत्नीच्या रक्षा विसर्जनाला जाणाऱ्या पतीचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे पत्नी मयत झालेल्या 24 तासांच्या आत वृद्ध पतीचे निधन झाल्याची दुःखद घटना बेळगाव शहरातील शिवाजीनगर भागात घडली आहे.
मयत झालेले व्यक्ती बेळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर होते कल्लापा मुरारजी प्रधान वय 83 रा. शिवाजीनगर बेळगाव असे त्यांचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कल्लाप्पा प्रधान यांच्या पत्नी पार्वती कल्लापा प्रधान वय 70 यांचे बुधवारी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांची रक्षा विसर्जन करण्यासाठी कल्लाप्पा प्रधान हे सदाशिवनगर स्मशानभूमी कडे जात होते त्यावेळी स्मशानभूमीच्या गेट वरच त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला व ते खाली कोसळले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोवर त्यांची प्राणज्योत मावळली होती.
केवळ 24 तासांतच या दोन्ही वृद्ध पती पत्नीचे निधन झाल्याने शिवाजीनगर भागांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कल्लाप्पा प्रधान यांनी बेळगाव मनपात उपमहापौर पद भूषविले होते ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ कट्टर कार्यकर्ते होते त्यांनी अनेक सीमा लढ्यात चळवळीत सहभाग घेतला होता.
शिवाजी नगर भागातील गणेश मंगल कार्याच्या उभारणीसाठी मोठं योगदान होत.1987 साली ग्यानी झेल सिंह बेळगावला आले होते त्यांनी प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं.माजी नगरसेवक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते होते त्यांनी दोन वेळा बेळगाव मनपाचे नगरसेवक पद भूषवले होते.
प्रधान यांच्या पश्चात्य विहाहित एक मुलगादोन मुली ,नातवंडे असा परिवार असून गुरुवारी 2:30 अंतिम संस्कार होणार आहेत.