belgaum

बेळगावात CCB पोलिसांची धडक कारवाई;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील एपीएमसी फ्रुट मार्केट परिसरात हेरॉइनची तस्करी करणाऱ्या टोळीवर CCB पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ₹5 लाख किमतीचे हेरॉइन जप्त केले आहे. या कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली असून, हेरॉइन पुरवठ्यामागील मुंबईतील एका महिलेचाही तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे महादेव गजानन पाटील (वय 28, रा. पाटील गल्ली, महाद्वार रोड, कंग्राळी (खुर्द), बेळगाव) आणि विनायक बाळू खंडाळे (वय 25, रा. रामदेव गल्ली, कंग्राळी (खुर्द), बेळगाव) अशी आहेत.

CCB चे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 belgaum

या छाप्यात संशयितांकडून 24.80 ग्रॅम हेरॉइन (किंमत ₹4,96,000) तसेच ₹5,000 किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ₹5,01,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान संशयितांना हेरॉइनचा पुरवठा करणारी मुंबईतील ‘अम्मा’ नावाने ओळखली जाणारी महिला असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

CCB पथकाच्या या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.