कोरोना बरोबर जनतेने आता जगायला शिकले आहे जनजीवन हळूहळू नॉर्मल होतं चालले आहे, भारत सणा सुदीचा उत्सवांचा देश,प्रत्येक ऋतु चक्रात भारतात उत्सव साजरे केले जातात.कोरोनामुळे यंदा जत्रा यात्रा झाल्याचं नाहीत.भाद्रपद महिन्यात येणारा गणेश उत्सवाचा सण हा मराठी मानबिंदू…यानिमित्ताने एक चैतन्यमय वातावरणात घराघरात पसरलेले असते परंतु यावर्षीच्या गणेश उत्सवावर नियमांची कृष्ण छाया पसरली आहे.
कोरोनाचा फैलाव ज्यादा होऊ नये म्हणून सार्वजनिक उत्सवासाठी अनेक प्रतिबंधात्मक अटी लादल्या गेल्या आहेत. युवा पिढीला या अटी जरी जाचक वाटत असल्या तरी त्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे.युवा पिढीला यातल्या बऱ्याच अटी जाचक वाटत आहे. जास्तीत जास्त चार फुटांची मूर्ती,आरतीसाठी पाचच जणांनी हजर रहाणे,मंडपाऐवजी मूर्तीची स्थापना नजीकच्या मंदिरात करणे,गणेश आगमन व विसर्जन हे मिरवणुकीने न करता साधे पणाने डॉल्बी फटाके आतषबाजी व गुलाल विरहित करणे,घरातील मूर्ती दोन फुटाच्या वर असू नये घरघुती गणेशाचे विसर्जन घराच्या आवारात करणे किंवा मनपाच्या फिरत्या टाकीत करावे त्याच बरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम भजन कीर्तन सार्वजनिक ठिकाणी करू नये अश्या अनेक अटी घातल्या आहेत या अटी जनतेचे हित विचारात घेऊनच घातल्या गेल्या आहेत.
जरी काही मंडळांच्या चार फुटाहुन उंच मूर्ती तयार असतील त्यांनी अश्या परिस्थितीत छोट्याच मूर्ती आणून प्रतिस्थापना करावी असा विचार पुढे येऊ लागला आहे किंबहुना प्रति वर्षी शास्त्रोक्त पद्धतीने नियमस्त गणपतीची मूर्ती बनवून त्यांची प्रतिस्थापना करावी आणि देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावं असाही विचार पुढे येत चालला आहे.कोर्टाचा निर्णय शेडूच्या मूर्ती बनवाव्यात असा आहे तेही विचारात घेऊन गणपतीच्या मूर्तीत पावित्र्य राखण्यासाठी मातीचाच उपयोग व्हावा असं शास्त्रही सांगत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
गणपती उत्सव अधिक विधायक पद्धतीनं कसा करता येईल,तसबी मूर्तिकारांना आपली कला सादर करण्यासाठी अधिक कसा वाव मिळेल, आणि या उत्सवाच्या अनुषंगाने जे अर्थ व्यवहार चालतात, फळ विक्री करणारे फुल विक्री करणारे, मकर बनवणारे,यांचाही विचार झाला पाहिजेत. खास करून मूर्तिकाराना या कोरोना काळात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे अश्या वेळी त्यांनी जर मोठ्या मूर्ती बनवल्या असतील तर मंडळांनी ती मूर्ती पुढच्या वर्षी पर्यंत तशीच ठेवण्यास सांगून छोटी आणतेवेळी विधायक दृष्टिकोन ठेऊन मूर्तिकाराना मोठ्या मूर्तीचेच मानधन अदा करावे, मूर्तिकार हे त्या त्या मंडळाशी वर्षानुवर्षे बांधील आहेत.यांच्या कुटुंबाचा विघ्नहर्ता बनण्याची संधी आहे हे मंडळांनी हुकू नये.
एका वर्षीच्या गणेशोत्सव साधे पणाने साजरा केल्यास आपल्या धार्मिकतेला कोणतीही बाधा येणार नाही उलट गणेशानेच आपल्याला सुबुद्धी दिली असे मानून जास्त विधायक समाज प्रबोधनात्मक कार्ये करणे हाच या वर्षीच्या गणेश उत्सवाचा उद्देश्य ठरू शकेल.