Tuesday, July 23, 2024

/

रुग्ण संख्येची 2 लाखाकडे वाटचाल : 3,510 झाली मृतांची संख्या

 belgaum

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी तब्बल 7,883 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,96,494 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मृतांचा आकडा 3,510 इतका झाला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 7,883 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 96 हजार 494 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 80,343 असून यापैकी 701 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज बुधवारी 7,034 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 1,12,633 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 113 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 3,510 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2802 रुग्ण – एकूण रुग्ण 79840), बेळ्ळारी (635-11995), म्हैसूर (544-8467), बेळगांव (314-6336) आणि धारवाड (269-6671).

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेंगलोर शहर 336 रुग्ण, हासन 46, धारवाड 33, कलबुर्गी 31, मंगळूर 28, दावणगिरी 27, बेळ्ळारी 23, रायचूर 17, कोप्पळ 16, गदग 15, मंड्या 15, तुमकूर 15, म्हैसूर 12, कारवार 12, बिदर 11, चित्रदुर्ग 11, बेळगांव 9, शिमोगा 9, हावेरी 7, कोडगू 6, चामराजनगर 5, चिकबेळ्ळापूर 5, उडपी 5, बागलकोट 4, चिक्कमंगळूर 2 आणि विजयपुरा 1 रुग्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.