Thursday, April 25, 2024

/

बेळगांव – बागलकोट रेल्वे मार्ग मोजणीमुळे शेतकर्‍यात घबराट

 belgaum

नियोजित बेळगांव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नंदिहळ्ळी परिसरातील शेत जमिनीमध्ये मोजणी सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

नियोजित बेळगांव -बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नंदिहळ्ळी परिसरातील शेत जमिनीमध्ये सेंटर खांब रोवून मोजमाप केले जात आहे.

नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी नंदिहळ्ळी येथील शेतजमिनींचे भूसंपादन करण्याच्या दृष्टीने ही मोजणी केली जात असल्याचे समजताच शेतकरी तणावाखाली आले आहेत.

 belgaum

संबंधित शेतजमीन अत्यंत पिकाऊ व सुपीक आहे. या जमिनीचे भूसंपादन झाल्यास बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

यासाठी सध्या सुरू असलेल्या मोजमाप घेण्याच्या कामामुळे नंदीहळ्ळी येथील शेतकरी धास्तावले असून याविरुद्ध आवाज उठविण्याचा विचार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.